र.वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार
र. वा. दिघे यांनी ग्रामीण जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखं, व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडली. त्यांच्या ११ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, ३ नाटके व १ लोकगीतसंग्रह, अशा एकूण २१ साहित्यकृतींतून व्यापक मानवतावादी दृष्टी, शेतीबद्दलचा आधुनिक विचारविवेक व्यक्त होतो. २५ मार्च १८९६ रोजी जन्मलेल्या रवांचे २०२० - २०२१ हे ‘शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष’ आहे. तर उद्या त्यांची ४०वी पुण्यतिथी आहे.......